Tuesday, 17 December 2013

आयुर्वेद व पंचकर्म उपचार पध्दती

Shree ayurved- the way to healthy life

आयुर्वेद व पंचकर्म उपचार पध्दती

‘’ पंचकर्म ‘’ म्हणजे पाच प्रकारच्या शरीर शुध्दीक्रिया ! तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली व नियंत्रित प्रकाराने हे उपचार केले जातात.

१.वमन उपचार – म्हणजेच बिघडलेला कफदोष उलटीद्वारे काढुन टाकुन शरीरशुध्दी करणे.मुख्यत; कफासाठी व काही प्रमाणात पित्त्तासाठी हा उपचार केला जातो. जुनाट दमा, खोकला, कान, नाक, घसा,डोळे यांचे विकार त्वचाविकार, अम्लपित्त्त, वजन कमि इ. विकारांसाठी वमन केले जाते. वसंत ॠतु म्हणजे चैत्र-वैशाख (मार्च-एप्रिल) महिन्यात कफदोष वाढुन कफाचे रोग होण्याची प्रव्रत्त्ती वाढते. त्यामुळे या वेळी वमन दिले जाते.

२. विरेचन उपचार;- मुख्यत; पित्त्त्तासाठी असणा-या या उपचारामध्ये जुलाबाद्वारे बिघड्लेले पित्त्त्त काढुन टाकले जाते. त्यामुळे विविध पित्त्त्तविकार तसेच मुळव्याध , पोटातील जंत, पोटदुखी, पचनाचे विकार , रक्तविकार , काविळ , स्त्रीयांचे काहि खास आजार,शुक्रदोष, मुत्ररोग व जुनाट मलावरोध यासाठी विरेचन अतिशय उपयुक्त असते. तसेच शरद ऋतुमध्ये (सप्टे-ओक्तोबंर )आपल्या शरीरात पित्त्त्त वाढते म्हणुन तेव्हा विरेचन घ्यावे.

३.बस्ती उपचार ;- मुख्यतः वातदोषासाठी हा उपक्रम करतात . बिघडलेला वात हा शरीरामध्ये रोगनिर्मिती करणारे एक प्रबळ कारण असतो . या वात दोषाला जिंकणारि बस्ती चिकित्सा म्हणूनच फार महत्वाची आहे.                                                                                बस्ती म्हणजे औषधि एनिमा. आयुर्वेदाने बस्तीला ‘अर्धी चिकित्सा’ असे म्हणुन खुप महत्त्व दिले आहे.कारण बस्तीमुळे सर्वात वेगवान वातदोष जिंकुन जो रोगनिर्मिती करतो त्याला जिंकुन आपण स्वास्थ्य मिळवु शकतो. तसेच आतड्याचे विकार, स्त्री बिजदोष , वात व मलाचा अवरोध, पाळीच्या तक्रारी ,सांध्याचे विकार, संधीवात, हाडांचे व मणक्याचे विकार, मज्जारज्जुचे विकार,वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे यावरही विजय मिळवता येतो.     
     स्थान भेदाने बस्तिचे- उत्त्त्तर बस्ति (स्त्रि व पुरुष वंध्यत्व, मुत्ररोगासाठी) ,शिरोबस्ती, नेत्र बस्ती,जानु बस्ती, ह्र्द बस्ती इ.प्रकार पडतात

.४.नस्य;- म्हणजे नाकात ओषधे टाकणे. आपले नाक हे शिरोभागाचे द्वार आहे असे आयुर्वेद मानतो. म्हणुनच नाक-कान-डोळे, शिरोभाग व ज्ञानेंद्रिय यांच्या स्वास्थ्य रक्ष्णासाठी व त्यांच्या विकारंवरील उपचार म्हणुन नस्य केले जाते.

५.रक्तमोक्षण ;- आयुर्वेदाने रक्ताचे महत्व ओळखले आहे. शरीराला जीवन पोषण देणे सर्व इंद्रियांची प्रसन्नता व त्वचेचे सौंदर्य हे रक्तावरच अवलंबुन आहे. म्हणुन रक्तमोक्षण या चिकित्सेत बिघडलेल्या रक्ताला थोड्या प्रमाणात शरीराबाहेर काढुन टाकले जाते. रक्तदोषाबरोबर विविध त्वचारोग, नेत्ररोग, मुखरोग,जुनाट व्रण,मुरुमे,व्हेरीकोझ व्हेन्स यावरही रक्तमोक्षण केले जाते.अर्थातच ही चिकित्सा देण्याआधी रुग्णाचे बल, शरीरातील रक्ताचे प्रमाण यांचे काळजीपुर्वक परिक्षण केले जाते.                         
      या उपचारांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शरीरात साठलेले दोष किंवा विषारी पदार्थ बाहेर काढुन टाकले जातात. त्यामुळे गुंतागुंतीच्या आजारांवरही उपचार करता येतात .तसेच दीर्घकाळ ओषध घेउनही बरे न होणारे विकार पुर्णतः बरे होतात . या उपचारांनी शरीराची शुध्दी होते. यामुळे पेशींना नवचैतन्य प्राप्त होते. म्हणुनच तारुण्य टिकवणारी ओषधे देण्यापुर्वी पंचकर्म चिकित्सा देणे गरजेचे आहे.          

तुम्ही स्वस्थ असा किंवा रुग्ण ,पंचकर्म चिकित्सा तुम्हाला महत्वाची आहे.

Monday, 16 December 2013

Shree Ayurved - the way to healthy life
//आयुर्वेद//
प्रयोजन-
स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम,आतुरस्स विकार प्रशनम !!   चरक संहिता
स्वस्थ (निरोगी)व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आतुर (रोगी) व्यक्तीचा विकार (रोग) बरा करणे.

आयुर्वेदाची व्याख्याः-
हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम !
मानं तच्च यत्रोक्तमायुर्वेदःस उच्चते !!------चरक सुत्रस्थान.

आयुर्वेद म्हणजे काय ?                             
हितकर आयुष्य,अहितकर आयुष्य ,सुखकर आयुष्य ,दुखकर अयुष्य,यांचे तसेच या आयुष्यासाठीच्या हितकर म्हणजे पथ्यकारक अहितकारक म्हणजे अपथ्यकारक गोष्टींचा अभ्यास ज्या शास्र्तामध्ये केला जातो,त्यास आयुर्वेद असे म्हणतात.
          आता असा पश्न पडतो की हितकर ,सुखकर आयुष्य म्हणजे काय ? हितकर आयुष्य म्हणजे दिर्घकालिन सुखकारक, स्वस्थ आयुष्य होय.कधी कधी काही गोष्ठी तत्काळ सुखकारक वाटल्या तरी दिर्घकालिन आयुष्याच्या दृष्टीने शरिरास हानिकारक असतात.उदा.जिव्हासुख देणारे पाणीपुरी,बटाटावडा यासारखे पदार्थांचे अतीसेवन झाले तर ते अपचन,पित्ताचे विकार,मुळव्याध,केसांचे विकार .अनेक प्रकारचे आजार त्या मनुष्याच्या प्रकृतीनुसार उत्पन्न करतात.या सर्वांचे उपाय ज्या शास्र्तात येतात तो आयुर्वेद होय.

·       आधुनिक काळात आयुर्वेद शास्त्रचा उपयोग त्याचे महत्वः-
सुखाने जगावे असे सर्वाना वाटते! पण जगण्याचे सुख फार थोडया लोकाना लाभते.भारतीयांनी जगाला दाखविलेले दोन राजमार्ग आयुर्वेद योगासने. अमेरिकेत च्यवनप्राश विकला जातो! जर्मनीत आसन प्राणयामाचे वर्ग चालत्तात………………पण भारतातील [महाराष्ट्रातील] किती लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व समजते?............                                    
       याचे महत्त्व सर्वांना उमगावे याकरिता आमचा हा प्रयत्नः………
    आयुर्वेदाची प्रगती ही माणसाच्या अनुभवजन्य ज्ञानातून झाली आहे. आयुर्वेद हे पुरातन शास्त्र आहे परंतु आजही आयुर्वेदाची तत्त्वे बदललेली नाहीत. तिच तत्त्वे वापरुन आजही तितक्याच प्रभावीपणे  रुग्ण बरे करता येतात ही गोष्टच आयुर्वेदाची प्रगल्भता स्पष्ट करण्यास पुरेसी आहे.
      आयुर्वेदामध्ये रोग होऊच नये म्हणुन करावयाच्या गो्ष्टी (स्वस्थस्य  स्वास्थ्य  रक्षणम) रुग्णास रोग मुक्त करणे ( आतुरस्य व्याधी परिमोक्षः) या दोन्ही गोष्टीचे वर्णन आले आहे . ॠतुनुसार शरीरात होणाऱ्या बदलांचा त्यावरील उपायांचा विचार फक्त आयुर्वेदामध्येच आला आहे.
       फक्त आजारी पडल्यावर औषध घ्या असे आयुर्वेद सांगत नाही, आयुर्वेद सांगतो ‘’ हितकर आहार घ्या, निरामय ,स्वस्थ जीवन जगा.’’ वॄदधांनी वातुळ पदार्थ टाळावेत, तरुणांनी खवळते पित्त आवरावे, बालगोपाळांनी खोकला वाढविणारा कफ औषधांनी थोपवावा  हेच आयुर्वदाचे सांगणे.
                 आज आपल्यापुढे अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत . आजची तरुणपिढि ही उत्साह, तारुण्य , चैतन्य यांनी परिपुर्ण हवी,पण प्रत्यक्षात दिसताहेत केस पांढरे होणे, केस गळणे, डोळ्यांचे विकार, व्यसनांच्या आधीन झालेले, स्पॉंडीलायसिस, लठ्ठपणा अशा विकारांनी जखडलेली आजची तरुणपिढी! अनेक स्त्रियाही घर करियर सांभाळताना तारेवरची कसरत करताहेत पण त्याबरोबर आवश्यक तो आहार, आराम ,व्यायाम,योग्य औषधोपचार यांच्या अभावामुळे स्त्रीयांमध्ये आढळतात, अशक्तपणा, हिमोग्लोबीन कमी असणे ,पाळीच्या तक्रारी इ……
           सध्याच्या धावपळीच्या जगात आजारापासुन मुक्त होण्यासाठी काही वेळा तात्कालिक आराम देण्या-या आधुनिक औषधांचे उपचार केले जातात. अशा उपचारांमुळे रोगाची लक्षणे नाहीशी झाल्यावर रोगमुक्त झाल्याची गैरसमजुत करुन घेतली जाते रोगाच्या मुळ कारणांवर उपचार करण्याचे दुर्लक्ष होते.यावर उपाय एकच,तो म्हणजे पुर्वापार चालत आलेला आयुर्वेद आचरणात आणने.

          कारण आयुर्वेद ही फक्त उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे.