Sunday, 29 June 2014

Shree Garbhasanskar - The art of parenting.


गर्भसंस्कार
“ संस्कारो हि गुणान्तराधानम्  
जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये
चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात.
 संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात.
संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो.

दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते. बहुतेक सर्व दांपत्यांना एक किंवा दोन अपत्येच असतात.
आपण त्यांना त्यांच्या अपत्यांमध्ये उत्तमोत्तम गुण येण्यासाठी प्रत्यत्न करु शकतो.
जर आपण मुलांना जन्मानंतर वाढ होताना चांगले संस्कार करुन उत्तम व्यक्तिमत्व बनवू शकतो;
तर गर्भावस्थेतही असे संस्कार का केले जाऊ नयेत ?? नक्कीच करता येतात…
ह्यास गर्भसंस्कार असे म्हणतात..
त्यांचे महत्व आयुर्वेदाने सध्याच्या धावपळीच्या युगात अधोरेखित केले आहे.
हजारो दांपत्यांनी गर्भसंस्काराद्वारे सुदृढ निरोगी व गुणी संतती अनुभवली आहे…
अश्या वेळी आपण का बरे ह्याचा फायद घेऊ नये ?
आयुर्वेदानुसार गर्भ संस्काराद्वारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, स्वास्थ्य व गुणवर्धन केले जाते.

गर्भसंस्काराचे टप्पे
१.      बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे )
२.      गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे )
३.      शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे )

१.      गर्भधारणपुर्व बीज संस्कार

१. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी
१.      प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे.
२.      प्रकृतिपरिक्षण करणे.
३.      पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी
४.      पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर.
५.      योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे.
६.      गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. )
७.      आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन )
८.      दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन )
१. ब ] गर्भधारण संस्कार
१.      गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी     ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.)
२.      गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे.

२.      गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार )

गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार
१.      नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी )
२.      गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार
३.      दिनचर्या ( पथ्य-अपथ्य )
४.      मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा
५.      योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा
६.      रंग चिकित्सा व गंध चिकित्सा
७.      सौंदर्यचिकित्सा
ह्यात काय काय केले जाते ?
१.      प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी                 बाळाची वाढ / परिक्षण / औषधी
२.      प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी           व्याधी चिकित्सा
३.      माता/पिता-गर्भ संवाद विधी
४.      संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी )
५.      प्रसव प्रक्रियेची माहीती.   प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा
६.      प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे.
७.      प्रसव कालीन परिचर्या.

३.      प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार )


१.      शिशू संगोपन                       ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. )
२.      शिशू षडमास परिचर्या                 ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. )
३.      षडमासोत्तर बाल-आहार विधी            ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था )
४.      मातेस षडमास सूतिका परिचर्या         (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.)

५.      शिशू संस्कार                       ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ.)
डॉ.प्रशांत व डॉ.प्रिया दौंडकर-पाटील
  आयुर्वेदाचार्य,योग आयुर्वेद पदविका.
contact- 9850498075/9922146452
www.ayurvedandpanchakarma.com/www.garbhasanskarpune.com